संघटनेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष सलीमखान पठाण व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात काही सूचना देण्यात आल्या आहेत.
सभासदांच्या कुटुंबातील सदस्याला कोरोना झाल्यास उपचारार्थ दोन लाख रुपये कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उपचाराचे बिल बँकेला सादर केल्यानंतर त्या बिलाची रक्कम बँकेकडून रुग्णालयाच्या खात्यावर जमा केली जाते. रुग्णांना प्रथमतः रुग्णवाहिका, मेडिकल औषधे व इतर साहित्य खर्च स्वत: अदा करावा लागतो. त्यामुळे बिल जमा करण्याची पद्धत वेळखाऊ आहे. त्याऐवजी कोविड कर्जाची रक्कम सभासदांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करावी. जेणेकरून या योजनेचा उद्देश पूर्णत सफल होऊन अधिक सभासदांना फायदा होईल असे काटकर यांनी म्हटले आहे.
कर्ज नियमांत सुधारणा करण्याबाबत अध्यक्ष पठाण, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, नानासाहेब बडाख यांना संपर्क केला असता सकारात्मक प्रतिसाद मिळाला. याबाबत चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. तसे न झाल्यास जिल्हाभर निषेधाचे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा काटकर यांनी दिला आहे.
निवेदनावर एकनाथ व्यवहारे, अशोक नेवसे, आबासाहेब लोंढे, नवनाथ अडसूळ, भागवत लेंडे, बाळासाहेब पोळ, सुहास पवार, अरुण मोकळ, बाळासाहेब मोरे, अनिल साळवे, बाबासाहेब जाधव, राजेंद्र रोकडे, प्रल्हाद वाकडे, मिलिंद खंडीझोड आदींच्या सह्या आहेत.
---