अहमदनगर : एका सामान्य कुटुंबातील तरुणाने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेले आहे. एमआयडीसीतील कामगाराच्या मुलाने साधलेले हे यश निश्चितच इतर तरुणांसमोर आदर्श आहे, असे नवनागापूरचे सरपंच डॉ. बबनराव डोंगरे यांनी सांगितले.
नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात नवनागापूर येथील गजानन कॉलनीतील रहिवासी भाऊसाहेब गुंजाळ यांचे सुपुत्र सूरज यांनी घवघवीत यश मिळविले आहे. त्यांचा नवनागापूरचे सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, माजी सरपंच दत्तापाटील सप्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. डोंगरे म्हणाले, नवनागापूरसारख्या गावातून एखादा मुलगा आयएएस व्हावा ही निश्चितच गावासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे. तसेच सूरजकडे पाहून गावातील अनेक तरुण स्पर्धा परीक्षेतून यश संपादन करतील. स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी शासन विविध सुविधा देत आहे. सूरजचे कुटुंब सर्वसाधारण असून, परिस्थितीचे अवडंबर न करता गुंजाळ कुटुंबीयांनी मुलांना चांगले शिक्षण दिले. त्यामुळे तरुणांनी परिस्थितीवर मात करीत सूरजचा आदर्श घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे, असे आवाहन डोंगरे यांनी केले.
...........
२६ नवनागापूर सत्कार