शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

काळजी घेतली नाही तर कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:15 AM

अहमदनगर : सोमवार (दि. ७)पासून लॉकडाऊन शिथिल झाले. अहमदनगर जिल्हा निर्बंध स्तर-१मध्ये येत असल्याने जिल्ह्यातील सर्व निर्बंध पूर्णपणे शिथिल ...

अहमदनगर : सोमवार (दि. ७)पासून लॉकडाऊन शिथिल झाले. अहमदनगर जिल्हा निर्बंध स्तर-१मध्ये येत असल्याने जिल्ह्यातील सर्व निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले. त्यामुळे सर्व बाजारपेठ खुली झाली, दुकाने उघडली. भाजीपाल्यासह इतर खरेदीसाठी गर्दी वाढली. नियमांचे पालन करण्याबाबत निष्काळजीपणा वाढला. एक जूनपासून कमी होत जाणारी कोरोनाची रुग्णसंख्या गुरुवारी अचानक वाढली. जिल्ह्यात ८६८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह नागरिकांचीही झोप उडाली आहे.

निर्बंध उठवले असले तरी लोकांनी निष्काळजीपणा दाखवला तर काय होऊ शकते, हेच वाढलेल्या रुग्णसंख्येतून दिसून आले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनानेही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी नियंत्रण ठेवणार का? याकडे लक्ष लागले आहे. ४ जून रोजी जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट ४.३०, तर ऑक्सिजन बेडचे प्रमाण २४ टक्के इतके होते. त्यामुळे अहमदनगर जिल्हा निर्बंध स्तर १ (लेवल १)मध्ये समाविष्ट झाला. त्यामुळे सर्वच निर्बंध उठविण्यात आले. ७ जूनपासून जिल्ह्यातील सर्व दुकाने, बाजारपेठा उघडल्या. नेहमीप्रमाणे रस्त्यावर गर्दी उसळली. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचे दिसते आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, अशीच स्थिती तयार झाली आहे. बुधवारी ४९९ इतके रुग्ण होते. दुसऱ्या दिवशी ही संख्या जवळपास दुप्पट झाली. गुरुवारी कोरोनाचे ८६८ रुग्ण आढळले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजार ५५४ इतकी आहे. गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४६४ आणि अँटिजन चाचणीत ३०१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (३९), राहाता (२२), संगमनेर (५५), श्रीरामपूर (३४), नेवासे (१११), नगर तालुका (४३), पाथर्डी (९५), अकोले (६८), कोपरगाव (६९), कर्जत (३७), पारनेर (७४), राहुरी (३६), भिंगार (६), शेवगाव (८३), जामखेड (११), श्रीगोंदे (७३), इतर जिल्हा (११) येथील रुग्णांचा समावेश आहे. नगर शहरातही २०, २२, १० अशी रुग्णसंख्या आढळून आली होती. ती गुरुवारी थेट ३९वर पोहोचली आहे. नेवाशेत सर्वाधिक १११ रुग्ण आढळले आहेत.

----------

दहा दिवसातील पॉझिटिव्ह आणि मृत्यूची नोंद

तारीख पॉझिटिव्ह मृत्यू

१ जून- १,१५२ २६

२ जून ८५८ ६४

३ जून १,३२६ २०

४ जून ७७१ २९

५ जून ८४३ ५

६ जून ९१४ ४०

७ जून ५३० ३०

८ जून ५३४ १८

९ जून ४९९ ४०

१० जून ८६८ २४

-----------

एकूण कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या : २,६२,०८१

उपचार सुरू असलेले रुग्ण : ४,५५४

मृत्यू : ३,७९५

एकूण रुग्ण संख्या : २,७०,४३०

----------