कोरडगाव : अतिवृष्टी होऊन तीन दिवस झाले तरी कोणी इकडे फिरकले नाही. साधा पाण्याचा टँकर दिला नाही. पंचनामे नाहीत. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. मदत नसेल करायची, तर दौरे करून काय उपयोग, अशा प्रश्नांची सरबत्ती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर करीत संतप्त शेतकरी, गावकरी व काही भाजप कार्यकर्त्यांनी तनपुरे यांना घेराव घातला.
गुरुवारी (दि.२) तनपुरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. कोरडगाव येथे तनपुरे आले असता सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण काकडे, सरपंच विष्णू देशमुख, वृद्धेश्वरचे संचालक बाबासाहेब किलबिले, कळस पिंप्रीचे सरपंच दिंगबर भवार, जिप सदस्य राहुल राजळे, भागवत कर्डिले, वसंत घुगरे, मधुकर देशमुख, अशोक कांजवणे, शुभम टुपके, बाळासाहेब देशमुख, स्वप्नील काकडे आदींनी घेराव घातला. त्यानंतर सोमठाणे येथे पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुभाष केकाण, वसंत पवार, पांडुरंग देशमुख, हरी देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी मंत्र्यांना घेराव घातला. कोरडगाव-पाथर्डी रोडवर आगासखंड येथे सरपंच पांडुरंग लाड यांच्यासह शेतकरी, कार्यकर्त्यांनी मंत्री तनपुरे यांना घेराव घातला.
अतिवृष्टी होऊन तीन दिवस झाले तरी प्रशासनाने साधे पाण्याचे टँकर पुरविले नाहीत. प्रशासनाकडून काहीच मदत होत नाही. उलट अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. अद्याप कोठेही पंचनामे सुरू झालेले नाहीत. मदत नसेल करायची तर दौरे करून काय उपयोग आहे, असे अकोलकर यांनी मंत्री तनपुरे यांना सुनावले. त्यावर सर्व यंत्रणा उद्यापासून काम सुरू करील, असे आश्वासनमंत्री तनपुरे यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, स्वप्नील देशमुख आदी दौऱ्यामध्ये तनपुरे यांच्यासोबत होते.
......................
नेते, मंत्री येत आहेत. फोटो काढून जात आहेत. सोशल मीडियावर टाकत आहेत; परंतु प्रत्यक्षात मदत मिळत नाही. मदत मिळावी, अशी आमची मागणी आहे.
-पांडुरंग देशमुख, नुकसानग्रस्त शेतकरी
.............
०२ कोरडगाव
सोमठाणे येथे विष्णुपंत अकोलकर, सुभाष केकाण, वसंत पवार, पांडुरंग देशमुख, हरी देशमुख आदींनी मंत्री तनपुरे यांना घेराव घालून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, शिवशंकर राजळे, स्वप्नील देशमुख आदींची उपस्थिती होती.
020921\img_20210902_190817.jpg
ना.प्राजक्त तनपुरे यांचा कोरडगाव अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी