शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

उसाला २२५० रुपये भाव न मिळाल्यास राज्यभर आंदोलन - नवलेंचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 4:21 PM

साखरेच्या पडलेल्या भावाचे कारण देत साखर कारखानदार उसाला मान्य केलेला भाव देण्याची टाळाटाळ करीत आहेत. काही कारखान्यांकडून ‘एफआरपी’सुद्धा देता येत नसल्याची भूमिका घेतली जात आहे.

अकोले : साखरेच्या पडलेल्या भावाचे कारण देत साखर कारखानदार उसाला मान्य केलेला भाव देण्याची टाळाटाळ करीत आहेत. काही कारखान्यांकडून ‘एफआरपी’सुद्धा देता येत नसल्याची भूमिका घेतली जात आहे. मान्य केलेला २२५० रुपये भाव न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऊसउत्पादक संघर्ष समिती व मार्क्सवादी किसान सभेने दिला आहे.मान्य केलेला दर देण्यास नकार देणे म्हणजे ऊसउत्पादक शेतक-यांचा विश्वासघात आहे. ठरल्याप्रमाणे बाजारभाव न दिल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिला. केंद्र सरकारने उसाला ९.५ टक्के साखर उता-यासाठी २५५० रुपये प्रतिटन, अधिक प्रतिएक टक्का वाढीव उता-यासाठी २६८ रुपये इतकी एफ.आर.पी. जाहीर केली. साखरेला प्रतिक्विंटल ३५०० रुपये भाव मिळेल, असे धरून हे भाव जाहीर करण्यात आले. संघर्ष समितीने साखरेच्या पडत असलेल्या भावाचा प्रश्न उपस्थित करून या प्रश्नात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. साखरेच्या भावावरून उसाचा भाव ठरविण्याऐवजी उसाच्या भावावरून साखरेचा भाव ठरवा व उसाला उत्पादनखर्चावर आधारित किमान समान पहिली उचल देण्यासाठी धोरण निश्चित करावे, अशीही मागणी संघर्ष समितीने केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले