शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

तीनशे कोटी न दिल्यास दानवेंना शहरबंदी : प्रहार संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 11:08 AM

महापालिका निवडणूक प्रचारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपला सत्ता दिली तर शहर विकासासाठी ३०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते.

अहमदनगर : महापालिका निवडणूक प्रचारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपला सत्ता दिली तर शहर विकासासाठी ३०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. आता मनपात भाजपची सत्ता आली आहे, त्यामुळे त्यांनी ३०० कोटींचा निधी द्यावा, अन्यथा दानवेंना शहरबंदी करू, असा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेने दिला आहे.दानवे शुक्रवारी नगर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी,अजित धस, दत्ताभाऊ झरेकर यांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून, त्याची प्रत निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिली. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, दानवे यांनी मनपा निवडणूक प्रचारात शहराला ३०० कोटींचे आश्वासन दिले होते. परंतु लोकांचा भाजपवर विश्वास नसल्याने त्यांना मनपात केवळ १४ जागा मिळाल्या. तरीसुद्धा राष्ट्रवादी व बसपाच्या नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी पदाची तमा न बाळगता भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे मनपात महापौर, उपमहापौर दोन्ही पदे भाजपला मिळाली. त्यामुळे दानवे यांनी आपल्या आश्वासनाप्रमाणे नगर दौºयावर येताना ३०० कोटींच्या निधीचे पत्र आणावे व ते महापालिकेकडे वर्ग करावे, अन्यथा दानवे यांच्या गाडीसमोर आडवे पडून त्यांना शहरबंदी करू, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.दानवे आज नगरमध्येलोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष दानवे शुक्रवारी नगरमध्ये दाखल होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकाºयांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी (दि.४) दुपारी चार वाजता दिल्ली गेट येथील दीक्षित मंगल कार्यालयात जिल्ह्यातील निवडक पदाधिकाºयांना ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दिली. महापालिकेच्या प्रचाराचा नारळ वाढविण्यासाठी दानवे नगरमध्ये आले होते.आता सत्तास्थापनेनंतर ते शहरात येणार असल्याने ते काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केल्याने त्यावर ते काय भाष्य करणार, याचीही उत्सुकता आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर