शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
2
"यांच्या स्वभावातच कोणाची..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
3
"काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील"; वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत म्हणाले, "तुम्ही मेरिटवर बोलत असाल तर..."
4
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
5
क्रिकेटच्या मैदानात 'बुद्धिबळातील चाल': टॉम लॅथमच्या विकेटसाठी R Ashwin नं असं विणलं जाळं (VIDEO)
6
उमेदवार जाहीर करण्याबाबत महायुतीने घेतली आघाडी; लोकसभा निवडणुकीपासून घेतला बोध!
7
डॉलरची दादागिरी संपुष्टात येणार? भारत-रशिया-चीनने बनवला प्‍लॅन, अमेरिकेच्या सर्वात मोठ्या ताकदीला आव्हान
8
Waaree Energies IPO allotment status: Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता
9
'गजनी २'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात! आमिर खानसोबत दिसणार साऊथमधील 'हा' मोठा सुपरस्टार
10
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
11
Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
12
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
13
का महाग मिळतं Personal Loan; कार, होम लोनवर का कमी लागतं व्याज? समजून घ्या गणित
14
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
15
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
16
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
17
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
18
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
19
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
20
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल

"एवढा आत्मविश्वास होता तर घरातलाच उमेदवार द्यायचा होता, एक तुमचे नातू...; सुजय विखे यांचा पवारांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 6:16 PM

सुजय विखे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर देत केला पलटवार...

निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका असा निरोप महसूलमंत्र्यांनी एका उद्योजकाकडून पाठवला होता, असा गोप्यस्फोट करत शरद पवार यांनी शुक्रवारी नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. यानंत आता, सुजय विखे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.

सुजय विखे म्हणाले, "तुमच्यामध्ये आत्मविश्वास होता, मग तुमच्या पक्षात दोन आमदार होते. एक तुमचे नातू (रोहित पवार) आहे, एक माजी मंत्री आहेत, तरीसुद्धा तुम्हाला बाहेरून उमेदवार घ्यावा लागतो आणि हे दोन लोक उभे राहायला तयार झाले नाही. एवढा तुमच्यात आत्मविश्वास होता, तर घरचाच उमेदवार द्यायला हवा होता. आत्मविश्वास कुणाचा डगमगलाय? याचे आत्मचिंतन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने करायचा विषय आहे."

हास्यास्पद विनोद, ऐकावा आणि सोडून द्यावा - "हे भाषण पश्चिम महाराष्ट्रात चाललं असतं अहिल्यानगरमध्ये हे भाषण चालू शकत नाही. चाळीस वर्ष ज्या व्यक्तींबरोबर आमच्या कुटुंबाचा संघर्ष आहे. चाळीस वर्षांत निरोप पाठवला नाही. आज कशाला पाठवणार. यामुळे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की, या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेऊ शकत नाही. त्यामुळे हा हास्यास्पद विनोद म्हणून लोकांनी ऐकावा आणि सोडून द्यावा," असा टोमणाही सुजय विखे यांनी यावेळी पवारांना हाणला.

राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दिले होते प्रत्युत्तर - यासंदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले होते, "शरद पवार यांच्या विधानाला मी फारसे महत्व देत नाही. कारण खोटं बालणे हा त्यांचा धंदाच झाला आहे. पवारांच्या धोरणात कुठे सातत्य आहे. कधी पाहाटे शपथविधी घ्यायला सांगतात, तर कधी भजपाला पाठींबा देऊ काढून घेतात. काँग्रेसमध्ये विदेशी मुद्यावरून ज्यांच्याशी फारकत घेतली, त्यांच्याच पायाशी जाऊन बसयाचे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील सगळे त्यांना सोडून गेले असून, पवार यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र होते. मात्र पवार यांनी नेत्यांमध्ये भांडणे लावली. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी, उद्योग, हे प्रश्न प्रलंबित असून, जिल्ह्याची पिच्छेहाट झाली आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे."

 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवारSujay Vikheसुजय विखेAhmednagarअहमदनगर