- आण्णा नवथरअहमदनगर: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राहिलेले नाही. आता हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आले असून, हिंदूंना टार्गेट केल्यास योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर येथे पत्रकरांशी बोलताना दिला.
कर्जत तालुक्यातील एका तरुणावर नुपूर शर्मा यांचा डीपी ठेवल्याने हल्ला झाला होता. या तरुणास अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. या रुग्णाची आमदार निलेश राणे व गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी दुपारी भेट घेतली. त्यानंतर राने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली.त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
राणे म्हणाले, की अमरावती येथे झालेल्या घटनेच्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामुळे कारवाई झाली नाही. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर तात्काळ अमरावती येथील घटनेची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये हल्लेखोरांचा संबंध जिहादीशी असल्याचे समोर आले. त्या घटनेप्रमाणेच कर्जत येथील घटनेतील हल्लेखोरांचा संबंध जिहादींशी यांच्याशी आहे किंवा नाही,याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी राणी यांनी केली.