शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

नगर जिल्ह्यात इफको खतांचा तुटवडा भासू देणार नाही; विवेक कोल्हे

By सचिन धर्मापुरीकर | Published: July 09, 2024 3:44 PM

कोपरगावात बारा वर्षांपासून बंद झालेला रॅक पॉईंट नव्याने सुरू

कोपरगाव (जि. अहमदनगर) : माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देत सहकाराच्या माध्यमातून त्यांच्या सर्वोच्च विकासाला प्राधान्य दिले. तोच वारसा कायम ठेवून नगर जिल्ह्यात इफको खतांचा तुटवडा भासू देणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन इफको (नवी दिल्ली) संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

तालुक्यातील कोपरगाव शिंगणापूर रेल्वेस्टेशन येथे बारा वर्षांपासून बंद झालेला इफको खत रॅक पॉईंट नव्याने सुरू करण्यात आला, त्याची विधिवत पूजा संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर व उपाध्यक्ष बाजीराव मांजरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अहमदनगर जिल्हा इफको क्षेत्रीय अधिकारी दिनेश देसाई यांनी प्रास्तविक केले.

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यासह आसपासच्या शेतकरी बांधवांना सातत्याने जाणवणारा इफको खतांचा तुटवडा लक्षात घेऊन कोपरगाव येथे सन २००७ मध्ये रॅक सुरू केला होता. मध्यंतरीच्या कालखंडात तो बंद पडला त्यामुळे आपली गैरसोय झाली तो पूर्ववत सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न केले. आगामी काळात आपल्या भागात युवकांसाठी ठोस काही रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी इफकोचे सहकार्य घेणार आहे असेही ते म्हणाले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, संचालक विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, निवृत्ती बनकर, राजेंद्र लोणारी, सरपंच विजय काळे, कैलास संवत्सरकर, उपसरपंच शाम संवत्सकर, मच्छिंद्र लोणारी, नानासाहेब थोरात, कामगार युनियनचे उपाध्यक्ष गणपतराव दवंगे, स्टेशन मॅनेजर बी. एस. प्रसाद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन इफकोचे क्षेत्र अधिकारी तुषार गोरड यांनी केले, तर आभार भाऊसाहेब वाघ यांनी मानले.अपघात विमा पूर्वीपेक्षा दुप्पट

इफकोद्वारे खरेदी करण्यात आलेल्या नॅनो युरिया आणि खाद यावर अपघात विमा पूर्वी पेक्षा दुप्पट करण्यात आला आहे. प्रत्येकी २ लाखापर्यंत कमाल मर्यादा असलेला अपघात विमा खाद खरेदीवर मिळणार आहे. त्यासाठी केवळ खरेदी पावती जपून ठेवावी लागणार आहे. यासह शेतकऱ्यांनी ऑपरेशन अथवा गंभीर आजारावर उपचाराकरीता किसान फंडाद्वारे वैद्यकीय मदत २५ हजारापर्यंत मिळण्यासाठी माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले.