आॅनलाइन लोकमतभेंडा (अहमदनगर), दि़ ५ - रेशनवरील रॉकेल खुल्या बाजारा विक्रीसाठी नेताना पकडण्यात आलेल्या अभिजीत किसन महाशिकारे याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात अखेर दहा दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला़तरवडी (ता. नेवासा) येथील अभिजित किसन महाशिकारे हा विना क्रमांकाच्या वाहनातून २५ एप्रिल रोजी रात्री कुकाण्याकडे कांद्याच्या गोण्याआड रॉकेलने भरलेली लोखंडी टाकी घेऊन जात असताना पोलीस पाटील विकास भागवत यांनी पकडून नेवासा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. लोखंडी टाकीतील ३९६१ रुपये ५० पैसे किमतीचे १९० लिटर रॉकेल वाहनासह पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरही तब्बल दहा दिवस याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदविला नव्हता़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर पुरवठा निरीक्षक बी. एन. धंडोरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नेवासा पोलिसांनी महाशिकारे याच्यावर गुन्हा नोंदविला़
बेकायदेशीर रॉकेल वाहतूक प्रकरणी दहा दिवसांनंतर केला गुन्हा दाखल
By admin | Published: May 06, 2017 2:56 PM