जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत कोरोनाची लक्षणे जाणवत असलेल्या रुग्णांच्या घशातील स्त्राव घेऊन ते आरटीपीसीआर पद्धतीने तपासणीकरिता जिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात, परंतु कोरोना संक्रमणाचा वेग आणि दररोज मोठ्या संख्येने समोर येणारे संशयित, यामुळे शासकीय प्रयोगशाळेतील यंत्रणेवर प्रचंड ताण वाढतो आहे. त्यातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अहवाल प्रलंबित राहत आहेत. दोन-तीन दिवस अहवाल मिळत नसल्याने त्या दरम्यान उपचारांची गरज असलेल्या रुग्णांची परवड होते. रुग्णांचे अहवाल प्रलंबित राहू नये, याकरिता पाथ फाउंडेशनने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाला आरटीपीसीआर मशीन दिले आहे. आतापर्यंत चारशेहून अधिक तपासण्या या मशीनद्वारे करण्यात आल्या आहेत.
--------------
संगमनेरात पहिले मशीन
संगमनेरातील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात विशेष कोविड १९ आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. रॉकफिलर फाउंडेशनच्या दिलेल्या देणगीतून पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून शासनाच्या मदतीसाठी घुलेवाडी आरोग्य केंद्रासाठी आरटीपीसीआर मशीन मोफत उपलब्ध करून दिले. त्यामुळे चाचण्यांचा वेग वाढून रुग्णांना तातडीने उपचार मिळत आहेत.