अहमदनगर : नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्यावतीने रविवारी स्वच्छता अभियान राबवून, अंमली पदार्थाची होळी करण्यात आली. यावेळी युवकांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी बिरोबा मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. जमा झालेल्या झाडांच्या पाला-पाचोळ्याची होळी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे यांच्या हस्ते पेटविण्यात आली. होळीत मावा, गुटखा, तंबाखू, विडी, दारुच्या बाटल्या, सिगारेट टाकून अंमली पदार्थांचे दहन करण्यात आले. यावेळी बिरोबा देवस्थानचे पुजारी नामदेव भुसारे, बाबासाहेब काळे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदीप डोंगरे, मयूर काळे, अक्षय पुंड, सुरेश पाचारणे, राजू गाडगे, भानुदास गाडगे, युवराज भुसारे, लीलाबाई गाडगे, मंदाताई डोंगरे, सुधीर येणारे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे आदी उपस्थित होते.
स्वच्छता अभियान राबवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 4:15 AM