अहमदनगर: मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती आणि अहिल्यानगर ( पूर्वीचे अहमदनगर) शहरातील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. या संहितेचे पालन भक्तांनी करावे ,असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेस विशाल गणपती ट्रस्टचे अभय आगरकर, रामेश्वर भुकन, बापू ठाणगे, अभिषेक भगत, संतोष बैरागी, पंकज खराडे, कन्हैय्या व्यास, मिलिंद चवंडके आदी उपस्थित होते. याविषयी माहिती देताना घनवट म्हणाले, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर, घृष्णेश्वर, मंदिर, अंमळनेर येथील देवमंगळग्रह मंदिर,अशा काही मंदिरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सवात्विक वस्त्र संहिता लागू आहे. शासकीय कार्यालयांतही वस्त्रसंहिता लागू आहे. मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेषभूषेत जाणे व्यक्तीस्वातंत्र्य असू शकत नाही. मंदिर हे धार्मिकस्थळ असून, तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचारण व्हायला हवे, असे म्हणाले.नगरमधील या मंदिरात वस्त्रसंहिता लागू
श्रीविशाल गणपती मंदिर- माळीवाडा, भवानीमाता मंदिर- बुर्हानगर, शनिमारुती मंदिर, दिल्लीगेट, शनि मारुती मंदिर- माळीवाडा, शनि मारुती मंदिर-झेंडीगेट,श्रीगणेश मंदिर राधाकृष्ण मंदिर- मार्केटयार्ड, विठ्ठल मंदिर- पाईपलाईन रोड, श्री दत्त मंदिर -पाईपलाईन रोड, श्रीराम मंदिर- पवननगर, सावेडी, भवानीमाता मंदिर- सबजेल चौक, श्री रेणुकामाता मंदिर- केडगाव, श्रीराम मंदिर- वडगाव गुप्ता, पावन हनुमान मंदिर- वडगाव गुप्ता, संत बाबाजी बाबा मंदिर- वडगाव गुप्ता, साईबाबा मंदिर- केडगाव, खाकीदास बाबा मंदिर