शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

काॅपी झाली तर संबंधित परीक्षा केंद्र संचालकांवर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By चंद्रकांत शेळके | Published: February 13, 2024 3:40 PM

दक्षता समिती बैठकीत दहावी-बारावी परीक्षेचे नियोजन

अहमदनगर : दहावी-बारावी परीक्षांच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावर काॅपी होणार नाही, याची सर्वच यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. जर केंद्रावर काॅपी झालेली आढळली तर केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. १२) दक्षता समितीची बैठक झाली. त्यात आगामी दहावी-बारावी परीक्षांच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी सालिमठ यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी उपस्थित होते. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या काळात, तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च या काळात होणार आहे. बारावीसाठी एकूण ११०, तर दहावीसाठी १८१ परीक्षा केंद्र असतील.

परीक्षा कालावधीत जास्तीत जास्त परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात याव्यात, उपद्रवी केंद्रांना परीक्षा कालावधीत विशेष करून भेटी देऊन गैर प्रकारास आळा घालावा, प्रत्येक परीक्षा केंद्रावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या भेटी व्हाव्यात, या पथकाने परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पडतील, असे प्रयत्न करावेत, उपस्थित पर्यवेक्षकामार्फत विद्यार्थ्यांची झडती केंद्रावर घेण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त देण्यात यावा, परीक्षा केंद्रावर इलेक्ट्राॅनिक्स साधनांच्या वापरावर प्रतिबंध करावा, परीक्षा केंद्र परीसरातील सर्व झेरॉक्स सेंटर पेपरच्या कालावधीत बंद ठेवावेत, परीक्षा केंद्रावरील बैठे पथकाच्या भेटी वाढवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सालिमठ यांनी दिल्या.दहावीसाठी ६८ हजार, बारावीसाठी ६४ हजार विद्यार्थीयंदा दहावी परीक्षेसाठी ६८ हजार ८९७, तर बारावीच्या परीक्षेसाठी ६४ हजार ४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. दहावीची परीक्षा १२ दिवस, तर बारावीची परीक्षा २२ दिवस चालणार आहे. संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे.जिल्हास्तरावर सात भरारी पथकेगैरप्रकाराला आळा बसावा म्हणून जिल्हास्तरावर ७ भरारी पथके तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय गणित, इंग्रजी या विषयांच्या पेपरला प्रत्येक परीक्षा केंद्रावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत बैठे पथक नियुक्त केले जाणार आहे. गणित, इंग्रजी या पेपरच्या दिवशी संवेदनशील केंद्रांवर व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीAhmednagarअहमदनगर