सचिन धर्मापुरीकर
कोपरगाव (जि. अहमदनगर) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोपरगाव येथे तीन जणांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. गुरूवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीनही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. अनिल गायकवाड यांना सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांनी उपोषणस्थळीच राहण्याचा आग्रह धरला. त्यांना उपोषणस्थळीच सलाईन लावले आहे.
दरम्यान आ. आशुतोष काळे यांनी उपोषणकर्ते ॲड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत यांची भेट घेवून मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला. यावेळी यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार संदीपकुमार भोसले, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख उपस्थित होते. यासर्वांनी उपोषणकर्त्यांना आत्मदहन न करण्याची विनंती केली. ती उपोषणकर्त्यांनी ती मान्य करून आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सोमवार (दि. ११)पासून ॲड. योगेश खालकर, अनिल गायकवाड, विनय भगत या मराठा समाज बांधवानी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या समवेत समाज बांधव देखील साखळी पद्धतीने उपोषण करीत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांची दखल न घेतल्याने शनिवार (दि.१६) रोजी आत्मदहन करण्याचा ईशारा त्यांनी प्रशासनाला दिला होता. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला.
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घ्यावी, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. महायुती शासन मराठा समाजाच्या आंदोलनाची गांभिर्याने दखल घेवून त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी शनिवार रोजी आत्मदहन करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली. हि विनंती मान्य करून उपोषणकर्त्यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला आहे. दरम्यान माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पद्मकांत कुदळे, धरमचंद बागरेचा, ॲड. राहुल रोहमारे, सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, कृष्णा आढाव, सुनील शिलेदार, मुकुंद इंगळे, शैलेश साबळे, सचिन गवारे, मनोज नरोडे, प्रशांत वाबळे, चंद्रशेखर म्हस्के, किशोर डोखे, बाबुराव खालकर, लक्ष्मण सताळे, नारायण लांडगे, अंबादास वडांगळे, नंदकुमार डांगे, राजेंद्र आभाळे, अक्षय आंग्रे, अमोल आढाव, डॉ. तुषार गलांडे, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, सुनील बोरा, अनिरुद्ध काळे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.