कोपरगाव : कोपरगाव येथील प्रसिद्ध डॉ. अमोल अजमेरे संचलित तीर्थकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कोपरगाव शहरातील तसेच तालुक्यातील रुग्णांसाठी या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यामध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग, फ्युजन पंप, अत्याधुनिक व्हेंटीलेटर, एक्स-रे सुविधा, काम्प्युटराईज ईसीजी, मल्टी पॅरामीटर्स, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम, मेडिकल नर्सिंग होम, पॅथॉलॉजी लॅब, एसी डिलक्स रूम, सेमी डिलक्स रूम यासह विविध सेवा उपलब्ध असल्याची माहिती डॉ. अमोल अजमेरे, डॉ. रवींद्र गायकवाड यांनी दिली आहे.
या उद्घाटनाप्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलत जाधव, ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोरावके, गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्र जाधव, उद्योजक अरविंद भनसाळी, कैलास ठोळे, श्रीरामपूर येथील डॉ. कुमार चोथानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग दडीयाल, दिलीप अजमेरे, राहुल अजमेरे, सचिन अजमेरे, आनंद अजमेरे, डॉ. राजेश माळी, डॉ. सुभाष मुंदडा, डॉ. तुषार गलांडे, डॉ. अजय गर्जे, डॉ. अतिश काळे, डॉ. प्रीतम जपे, डॉ. योगेश कोठारी उपस्थित होते.
............
वाणिज्य वार्ता
......
फोटो-१०कोपरगाव हॉस्पिटल इमारत