अहमदनगर : जिल्ह्यात रोज सरासरी ५ ते ६ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. त्यातून दिवसाला २,२०० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह येण्याचा दर हा ३६ टक्क्यांवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी बाधित होण्याचे प्रमाण १८ टक्के होते. ते आता दुप्पट झाले आहे. कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण हे शासकीय आकडेवारीनुसार १.१४ इतके दाखवले जात असले तरी सध्या होणाऱ्या मृत्यूचा आकडा पाहिला तर हे प्रमाणही १.३८ टक्क्यांपर्यंत गेल्याने जिल्ह्यात चिंता वाढली आहे.
राज्य शासनाने लॉकडाऊन केल्यानंतरही जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा कमी झालेला दिसत नाही. रोज सरासरी २ हजार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. तर चाचणी झालेल्यांपैकी पॉझिटिव्ह येण्याचा दर ३६ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे चिंताही वाढली आहे.
-------------
असा वाढले प्रमाण
महिना बाधित रुग्ण बाधित प्रमाण मृत्यू मृत्यूचे प्रमाण
एप्रिल २०२०
जून-२०२०
ऑगस्ट २०२०
ऑक्टोबर २०२०
डिसेंबर २०२०
फेब्रुवारी २०२१
एप्रिल २०२१
---------------
आकडेवारीमध्ये तफावत
सध्या अमरधाममध्ये रोज ४० ते ४५ जणांवर अंत्यसंस्कार होत आहेत. असे असताना शासकीय पोर्टलवर मृत्यूचा आकडा हा अत्यंत कमी दाखवला जात आहे. ज्या दिवशी ३२ मृत्यू झाले, त्या दिवशी शासकीय पोर्टलवर १३ जणांचा मृत्यू दाखवला होता. दोन दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या ४५ जणांवर अंत्यसंस्कार झाले. त्या दिवशी शासकीय आकडेवारीत फक्त ३ जणांचा मृत्यू दाखवला होता. त्यामुळे मृत्यूच्या आकडेवारीत तफावत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत आरोग्य यंत्रणा मात्र बोलायला तयार नाही. याबाबत माहिती घेण्यासाठी शनिवारी संपर्क साधला असला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
------------------
एकूण आकडेवारीशी तुलना केल्याने गांभीर्य कमी
बाधित रुग्णांचे प्रमाण काढताना आरोग्य यंत्रणेकडून आतापर्यंत झालेल्या चाचण्यांपैकी आतापर्यंत झालेल्या बाधितांची संख्या किती आहेत, अशा पद्धतीने प्रमाण काढले जाते. त्यामुळे बाधित होण्याचे प्रमाण कमी दिसते. ९ एप्रिलच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत झालेल्या चाचण्या ५ लाख २३ हजार ९०५ इतक्या आहेत. त्यापैकी १ लाख ११ हजार ४२३ इतके पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे बाधिताचे हे प्रमाण २१. २७ टक्के इतके दिसते आहेत. सध्या रोज ५ ते ६ हजार चाचण्या होत असून, त्यापैकी सरासरी २,२०० जण पॉझिटिव्ह येत आहेत. दिवसाचे हे प्रमाण ३६ टक्के आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना कोरोनाची गांभीर्य लक्षात येत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
--------------