अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी २१५ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर बरे झाल्याने १७६ जणांना घरी सोडण्यात आले. नऊशेच्या आत असलेली सक्रिय रुग्णसंख्या नव्या बाधितांमुळे बाराशेच्या पुढे गेली आहे. सध्या जिल्ह्यात १२८८ एवढे सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५२ आणि अँटीजेन चाचणीत १७ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (६३), अकोले (२१), कोपरगाव (११), नेवासा (१), पारनेर (७), पाथर्डी (३), राहाता (२९), संगमनेर (३१), कॅन्टोन्मेंट (१), जामखेड (१), कर्जत (३), कोपरगाव (११), नगर ग्रामीण (११), नेवासा (५), राहुरी (७), शेवगाव (१), श्रीगोंदा (१), श्रीरामपूर (९), इतर जिल्हा (९)
आज १७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार १०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, बुधवारी एका रुग्णाचा मृत्य झाला.
-----
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : ७४१००
उपचार सुरू असलेले रुग्ण : १२८८
मृत्यू : ११४८
एकूण रुग्णसंख्या : ७६५३६