महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषद शेतकरी प्रथम कार्यक्रम आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ऑनलाइन खरीप हंगाम नियोजन प्रशिक्षण व शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद गडाख बोलत होते. यावेळी अटारी पुणेचे संचालक लाखन सिंग, पी. व्यंकटेशन, आनंद सोळंके, एम.पी. देशमुख, नंदकुमार कुटे, पंडित खर्डे, महेंद्र ठोकळे, रायभान गायकवाड उपस्थित होते.
लाखन सिंग म्हणाले, शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत चिंचविहिरे व कणगर या गावांमध्ये एकात्मिक शेती पध्दतीचा प्रसार व अवलंबन योग्य प्रकारे होत आहे. शेतकरी बांधवांनी पीक उत्पादन वाढीसाठी योग्य तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर करावा. ठोकळे म्हणाले, शेतकऱ्यांनी मृद आरोग्य पत्रिकानुसार खतांचा वापर करावा, बीज प्रक्रिया, जैविक खतांचा वापर यावर भर देऊन उत्पादन खर्च कमी करावा. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.