लोणी खुर्द ग्रामपंचायतीत एकूण १७ जागांसाठी निवडणूक झाली. गेल्या वीस वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर माजी मंत्री, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांच्या गटाचे वर्चस्व होते. येथे माजी आमदार चंद्रभान घोगरे यांचे चिरंजीव जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची निवडणूक झाली. यात परिवर्तन पॅनलने ११ जागा जिंकल्या, तर विखे गटाला ६ जागांवरच समाधान मानावे लागले.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे : प्रभाग १ शरद आहेर, संगीता तुपे, सुनीता कोरडे. (परिवर्तन मंडळ). प्रभाग २ जनार्धन घोगरे, अर्चना आहेर (परिवर्तन मंडळ), अलका राऊत (विखे प्रणित जनसेवा मंडळ). प्रभाग ३ प्रदीप ब्राह्मणे, आशा दिलीप आहेर (परिवर्तन मंडळ), प्रभाग ४ मायकल ब्राह्यणे, विलास घोगरे, ललिता आहेर (परिवर्तन मंडळ), प्रभाग ५ किरण आहेर, ज्योती आहेर, रुपाली घोगरे (विखे प्रणित जनसेवा मंडळ). प्रभाग - ६ - जनार्धन घोगरे (परिवर्तन मंडळ), रोहिदास बोरसे, मंगल बारसे (विखे प्रणित जनसेवा मंडळ).
.....
राहाता तालुक्यात परिवर्तनचा रथ सुरू झाला असून, धनशक्ती विरूध्द जनशक्तिचा हा विजय आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतली तर काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण लोणी खुर्द गावच्या मतदारांनी दाखवून दिले आहे.
-जनार्धन घोगरे, परिवर्तन मंडळ, लोणी खुर्द, ता. राहाता.
..
फोटो-१८लोणी खुर्द
...
ओळी-लोणी खुर्द ग्रामपंचायतीत विजयानंतर परिवर्तन पॅनलच्या नवनिर्वाचित उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.