याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना बुधवारी ( दि. ५) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जरे यांचे हत्याकांड होण्यापूर्वी बोठे याने तो काम करत असलेल्या दैनिकात हनीट्रॅप नावाची मालिका अनेक भागात प्रकाशित केली होती. ही मालिका बोठे याने कशासाठी लिहिले होती, त्याचा या पाठीमागचा उद्देश काय होता, या माध्यमातून कुणाला ब्लॅकमेलिंग करण्याचा उद्देश होता का? तसेच कुणाच्या संदर्भात हे लिखाण केले होते? याची खोलवर जाऊन चौकशी करावी.
बोठे याने लिहिलेल्या मालिका संदर्भात पोलिसांनी त्याला पत्र देऊन त्या संदर्भात माहिती मागितली होती. याबाबत बोठे याने काय खुलासा केला याचीही चौकशी करावी. तसेच बोठे याने स्वतः यासंदर्भात तक्रार का केली नाही. आदी सर्व बाबींची चौकशी करून स्वतंत्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लगड यांनी केली आहे.