अहमदनगर/संगमनेर/सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीमधील एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला, नगर शहरातील एका खासगी रुग्णालयातील महिला कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. यासह संगमनेर तालुक्यात कोरोनाचे चार असे दिवसभरात जिल्ह्यात एकूण सहा रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या २३२ इतकी झाली आहे.पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील खासगी कंपनीतील व्यवस्थापक हे दिल्लीहून प्रवास करून आले होते. त्यांना क्वारंटाईन करण्यात आलेले होते. मात्र सर्दीचा त्रास होत असल्याने त्यांनी तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अन्य पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. संगमनेर येथील चार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये एक निमोण येथील तर अन्य शहरातील आहेत. त्यामध्ये संगमनेर शहरातील देवीगल्ली येथील ५२ वर्षाच्या व्यक्तीचा समावेश आहे.अहमदनगर शहरातील एका महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. कायनेटिक चौकातील त्या महिलेने खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत त्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ती महिला एका खासगी रुग्णालयात काम करते.----------शाखा अभियंता पॉझिटिव्हशेवगाव : येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या एका शाखा अभियंत्यास शारीरिक त्रास होऊ लागल्याने त्यांनी औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात तपासणी केली. त्यामध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित अधिकारी काही दिवसांपासून शेवगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते. ‘ते’अधिकारी सध्या औरंगाबाद येथे उपचार घेत आहेत. अभियंता बाधित झाल्याने पंचायत समितीच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. ‘त्या’ अभियंत्यांच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीसाठी नगरला पाठविण्यात आले आहे.