अहमदनगर: ग्रामीण भागात पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यावर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च होतात़ मात्र जिल्ह्यातील शंभर टक्के गावांत स्वच्छ पाणीपुरवठा होत नसून, जिल्ह्यातील १३१ गावांतील ग्रामस्थ न कळतपणे दुषित पाणी पित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा यंत्रणेच्या कामकाजावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे़उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे़ उन्हाळ्यात पिण्याचे पाणी स्वच्छ असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते़ ग्रामीण भागाला प्रादेशिक व नळ योजनांमार्फत पिण्याचे पाणी पुरविण्यात येते़ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भुजल सर्वेक्षण विभागाने ग्रामीण भागातील १ हजार ८६५ पाणी नमुने तपासले़ त्यापैकी १३१ गावांतील पाणी नमुने दुषित असल्याचे तपासणीतून समोर आले आहे़ पारनेर तालुक्यातील सर्वाधिक २२ गावांमध्ये दुषित पाण्याच्या पुरवठा होत असल्याचे यावरून समोर आले आहे़गावांना पाणीपुरवठा करताना पाण्यात ब्लिचिंग पावडर मिसळली जाते़ पाणी शुध्द करण्यासाठी ब्लिचिंग पावडर, क्लोरीन वायू आणि तुरटीचा वापरली जाते़ या पावडरची गुणवत्ताही प्रशासकीय यंत्रणेकडून तपासण्यात आली आहे़ पावडरचे २०२ नमुने घेण्यात आले होते़ त्यापैकी ११ ठिकाणची पावडर निकृष्ट दर्जाची आढळून आली आहे़ पाणी मिसळण्यात आलेल्या क्लोरीनचेही नमुने घेण्यात आले होते़ त्याचा अहवालही प्राप्त झाला असून, जिल्ह्यातील ११ गावांत २० टक्केपेक्षा कमी क्लोरीन आढळून आले आहे़ जिल्ह्यातील गाव, वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभामध्ये ब्लिचिंग पावडर, क्लोरीन आणि तुरटीचा वापर करण्याकडे पाणीपुरवठा यंत्रणेकडडून दुर्लक्ष केले जात आहे़ त्यमाुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची भिती व्यक्त होत आहे़ पाणीपुरवठा यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़जिल्हा परिषदेत बैठकांचा फार्सग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाºया पाणी योजनांबाबत जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा व आरोग्य विभागाच्या बैठका होतात़ मात्र बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी होते का हा संशोधनाचा विषय आहे़ त्यामुळे बैठका केवळ फार्स ठरत असल्याचेही यावरून दिसते़दुषित पाणीपुरवठा होणारी गावेराहुरी- १५, संगमनेर-५, अकोले-१२, पारनेर-२२, नेवासा-१४, जामखेड-७, पाथर्डी-५, नगर-१५, शेवगाव-३, कर्जत-६, कोपरगाव-११, राहाता-८, श्रीरामपूर-५, श्रीगोंदा-३,ब्लिचिंग पावडर निकृष्टअकोले-३, पारनेर-२, संगमनेर-२, नगर-२, कर्जत-२,