अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने फिरत्या दवाखान्यामार्फत अँटिजन चाचणी करण्यास सोमवारी बोल्हेगाव येथून सुरुवात केली. दररोज ५०० चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
फिरत्या दवाखान्यांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभागृह नेते रवींद्र बारस्कर, आरोग्य समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक सागर बोरुडे, नगरसेवक राजेंद्र कातोरे, कुमार वाकळे, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष आदेश चंगेडिया, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, किरण कातोरे आदी उपस्थित होते. आमदार जगताप यांनी उपक्रमाबाबत माहिती दिली. ते म्हणाले. नगर शहरातील नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यास अँटिजन तपासणी करून घ्यावी. महापौर वाकळे म्हणाले, संपूर्ण शहरात फिरत्या दवाखान्यामार्फत नागरिकांची अँटिजन तपासणी करण्यात येणार आहे. जेणेकरून रुग्णांवर ताबडतोब उपचार घेणे शक्य होईल. तात्काळ उपचार झाल्यास शहरातील मृत्यूचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल.
फोटो-१० महापालिका