अहमदनगर : रेल्वे स्टेशन येथील गायके मळ्यातील नागरी समस्यांची पाहणी करून टप्प्याटप्प्याने सर्व समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांना दिले.
या वेळी नगरसेवक विजय गव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, विजय गायके, सतीश भागवत, सोमनाथ भुजबळ, राहुनाथ चौरे, प्रकाश गांधी, सुभाष चोभे, रमेश उदमले, अभिषेक घटमाळ, अशोक काळे, राहुल गिल्डा, अलका गायके, नीता जाधव, शिल्पा शहाने, वैशाली बुधवांत, मिलन गांधी, पूजा दिवटे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, गेल्या चाळीस वर्षांपूर्वी पाणीपुरवठा करणारी योजना झाली होती. परंतु, नगर शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी मुळा धरणातून पुन्हा दुसरी पाण्याची लाइन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही योजना पूर्ण होऊन नगर शहराला पूर्ण दाबाने पाणी उपलब्ध होईल. तसेच शहरातील पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागणार असून, शहरात लवकरच ४० हजार एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.
......
सूचना: फोटो २६ रेल्वेस्टेशन नावाने आहे.