खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील इंगोले कृषी फार्मला उपविभागीय कृषी अधिकारी अनिल गवळी यांनी नुकतीच भेट दिली. येथे त्यांनी सुधारित शेवगा लागवडीची पाहणी केली.
यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी अशोक गीते, मंडल कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील, दीपक लोंढे, कृषी पर्यवेक्षक अधिकारी सुरेश कटके, तालुका आत्मा प्रमुख तुषार गोलेकर, ज्ञानेश्वर इंगोले उपस्थित होते.
नवीन सुधारित शेवगा वाण राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे. एकरी १०० टन उत्पादन काढण्याचे इंगोले यांचे उद्दिष्ट खूपच वाखाणण्याजोगे आहे, असे गवळी म्हणाले. त्यांनी ‘स्मार्ट योजने’ची माहिती दिली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नधान्य प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत शेवग्यापासून विविध उत्पादने तयार करण्याची माहितीही त्यांनी शेतकऱ्यांना दिली. प्रगतिशील शेतकरी हरेराम इंगोले, दयानंद इंगोले, डॉ. मुरहरी इंगोले, ज्ञानेश्वर इंगोले यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले.
----
२१ खर्डा गवळी
खर्डा येथील इंगोले यांच्या शेवगा पिकाची पाहणी करताना कृषी अधिकारी अनिल गवळी व इतर उपस्थित होते.