शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

पारनेर तालुक्यात स्वस्त धान्य वितरकांकडून अपुºया प्रमाणात धान्य पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 1:05 PM

पारनेर : तालुक्यातील ढवळपुरी, वनकुटे, रूईछत्रपती, पाडळी रांजणगाव, डिकसळ येथील स्वस्त धान्य वितरकांकडून अपुºया प्रमाणात धान्य पुरवठा होत असल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. ढवळपुरी येथील स्वस्त धान्य दुकान निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तालुक्यात येणारे धान्य अपुरे असल्याने ते खरोखरच स्वस्त आहे की फस्त केले जाते, असा प्रश्न रेशनधारकांना पडला आहे.

विनोद गोळे पारनेर : तालुक्यातील ढवळपुरी, वनकुटे, रूईछत्रपती, पाडळी रांजणगाव, डिकसळ येथील स्वस्त धान्य वितरकांकडून अपुºया प्रमाणात धान्य पुरवठा होत असल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. ढवळपुरी येथील स्वस्त धान्य दुकान निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तालुक्यात येणारे धान्य अपुरे असल्याने ते खरोखरच स्वस्त आहे की फस्त केले जाते, असा प्रश्न रेशनधारकांना पडला आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी धान्याचा सेवा संस्था पुरवठा करतात. सध्या सगळीकडे पॉस मशीनद्वारे धान्य वितरण होत आहे. त्यामुळे धान्य वितरणात कमी गडबडी होत आहेत. मात्र कोरोनानंतर केेंद्र सरकार आणि राज्य सरकारने गहू, तांदूळ, डाळ यांचे वाटप मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अनागोंदी होत आहेत. वनकुटे, पाडळी रांजणगाव येथे धान्य वितरण व्यवस्थित होत नसल्याने तक्रारी होत्या. याबाबत नायब तहसीलदार सुभाष माळवे यांच्या पथकाने या धान्य दुकानात जाऊन चौकशी केली आहे. 

या दुकानातील धान्य वितरण सुरळीतपणे सुरू असल्याचे नायब तहसीलदार लक्ष्मीकांत रोहोकले यांनी सांगितले.ढवळपुरी येथील धान्य दुकानाबाबत तक्रारी असून त्यात काही अनागोंदी आढळून आल्याचे समजते. त्यामुळे येथील दुकान निलंबनाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

दुर्गम भागात ‘रेंज’चे अडथळेच्पारनेर तालुक्यातील पळसपूर, पोखरी, देसवडे, काटाळवेढा, वनकुटे, वारणवाडी भागात इंटरनेट नसल्याने पॉस मशीनवर धान्य वितरण करण्यात अडचणी येत आहेत.च्अनेक ज्येष्ठ नागरिकांचे ठसे उमटत नसल्याने त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.

पारनेर तालुक्यातील धान्य दुकानांमध्ये सुरळीतपणे धान्य वाटप सुरू आहे. ढवळपुरी येथील दुकानांबाबतीत चौकशी करून दुकान निलंबन प्रस्ताव पाठवला आहे. इतर दुकानांंची नायब तहसीलदार यांच्या पथकाने चौकशी केली आहे.    - ज्योती देवरे,     तहसीलदार, पारनेर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर