श्रीगोंदा : मढेवडगाव सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत सोसायटीच्या सर्व सभासदांना दोन लाखाचे विमा संरक्षण देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सोसायटीचे अध्यक्ष बापूसाहेब वाबळे म्हणाले, संस्थेचा कर्जपुरवठा १० कोटी आहे. संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या जागेमध्ये भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून त्यामध्ये शेतकरी सभासदांच्या हिताचे व्यवसाय उभे करून गावांमध्ये नवीन बाजारपेठ उभी करणार आहे.
यावेळी नागवडे साखर कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, सोसायटीचे माजी अध्यक्ष पंडित वाबळे, निळकंठ उंडे, हनुमंत झिटे, प्रा. संजय मांडे, बबन उंडे, प्रा. संजय उंडे, प्रा. साहेबराव मांडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष रावसाहेब जाधव, संचालक गोरख मांडे, काकासाहेब मांडे, वर्षा वाबळे, सुरेखा शिंदे, हिराबाई झिटे, भगवान ससाणे, सीताराम बनकर, गोरख त्रिंबक मांडे, ताराबाई मांडे, नंदिनी वाबळे, प्रा. फुलसिंग मांडे आदी उपस्थित होते.