शेवगाव : येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता पालवे यांची नगरला बदली झाल्यामुळे नेवासा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी सोपान ढाकणे यांच्याकडे शेवगावचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे़ शनिवारी त्यांनी पदभार स्वीकारला़पालवे यांची शेवगाववरुन पारनेर एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पात बदली झाली होती़ मात्र, त्यांच्याकडे शेवगावचा प्रभारी पदभार देण्यात आला़ त्यामुळे त्या तीन वर्ष शेवगावलाच थांबल्या़ जूनमध्ये झालेल्या बदल्यांमध्येही पालवे यांची बदली पारनेरहून नगरला करण्यात आली़ मात्र, पालवे या शेवगावचाच पदभार सांभाळत होत्या़ त्यांची कार्यमुक्त्ती करण्यात आली नव्हती़ त्यामुळे त्या नगरला हजर झाल्या नव्हत्या़ शनिवारी नेवासा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी ढाकणे यांनी शेवगाव एकात्मिक बालविकास प्रकल्पात सहायक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा अतिरिक्त पदभार स्वीकारला़ त्यामुळे पालवे यांना कार्यमुक्त करुन नगरला हजर होण्याचे आदेश बजावण्यात आल्याचे सांगण्यात येते़एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पातील अनेक पदे रिक्त असल्यामुळे शेजारच्या तालुक्यातील अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदभार सोपविण्यात येत आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़शेवगावच्या सहायक बालविकास प्रकल्प अधिकाºयांबाबतीत मला काहीही माहिती नाही़ माहिती घेऊन सांगतो़ -वासुदेव सोळुंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभागसहायक बालविकास प्रकल्प अधिकारी पालवे यांची बदली पारनेरला झाली होती़ मात्र, शेवगावची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्याकडे सोपविल्यामुळे त्या शेवगावलाच होत्या़ याबाबत मंत्रालयातून आदेश होते़ शनिवारी नेवाशाचे बालविकास प्रकल्प अधिकारी ढाकणे यांच्याकडे शेवगावचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे़ -संजय कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग
एकात्मिक बालविकास प्रकल्प : ढाकणे यांच्याकडे शेवगावचा प्रभारी चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:50 PM