राहुरी : आराम करण्याचे दिवस असतांना बारागाव नांदूर येथील ७५ वर्षीय श्रीरंग बाबूराव नालकुल तथा नालकुल गुरूजी हे विद्यार्थ्यांना योगाचे धडे देत आहेत. शिक्षकी पेशातून निवृत्त झालेल्या नालकुल गुरूजी यांनी कोणताही कोर्स न करता आस्था चॅनलवर स्वामी रामदेव बाबा यांचा योग प्राणायमचा कार्यक्रम बघितला़ आपणही योग प्राणायम करू शकतो, असा सकारात्मक विचार करीत योगाचे धडे घरबसल्या घेतले़अगंतुकपणे नालकुल गुरूजी हे योग प्राणायम या क्षेत्रात आले़ पत्नीचे निधन झाल्यानंतर बोलण्यासाठी कुणी नव्हते़ मग रिकामे बसण्यापेक्षा त्यांनी एकदा रामदेव बाबांना टिव्हीत पाहिले. एकलव्याने बाहेरून शिक्षण घेतले तसे आपणही शिक्षण घ्यावे म्हणून सुरूवात केली़ टिव्हीवर गेल्या चार पाच वर्षांपासून योग प्राणायम करणारे नालकुल गुरूजी हे योग गुरू बनले आहेत़ योग प्राणायम करताना उतार वयातही त्यांच्या अंगात असलेली लवचिकता अनेकांना थक्क करणारी आहे़ शीर्षासनासारखे असने ते सहज करून दाखवितात़योग विद्या स्वत:पुरती सीमीत न ठेवता नालकुल यांनी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य सुरू केले़ ‘करो योग, रहो निरोग...’ हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविला़ साडेतीनशे शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले आहेत़ योग प्राणायम केल्यास रोग दूर पळतो असे ठसविण्याचा प्रयत्न नालकुल गुरूजी सातत्याने करीत आहेत़ मानधन देवो अथवा न देवो पदरमोड करून मोटारसायकलवरून नालकुल गुरूजी यांची रपेट सुरू आहे़नालकुल गुरूजी हे योग प्राणायमचे धडे देतांना आरोग्याचीही माहिती देतात़ युवकांनी प्राणायम केला तर बलशाली भारताचे स्वप्न साकार होईल, असा संदेशही देतात़ शाळा-महाविद्यालय नालकुल गुरू जींना प्रमाणपत्र देऊन सन्मानीतही करतात़ज्ञानेश्वरी व गाथेचाही नालकुल गुरूजी यांचा अभ्यास आहे़ दररोज पहाटे उठून नालकुल गुरूजी हे नियमित योग प्राणायम करीत आहेत़ उतारवयात योगाचे टिव्हीवरून धडे घेऊन इतरांना ज्ञान देण्याचे धडपड समाजाला पे्ररणादायी ठरावी अशीच आहे़दमा बरा झाला़़़़नालकुल गुरूजींना दम्याच्या विकारांने पछाडले होते़ डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या सुरू केल्या़ आभाळ आले की दम्याची तीव्रता वाढत असे़ रामदेवबाबांना टिव्हीवर बघून योग प्राणायम शिकण्याची संधी मिळाली़ कालांतराने दम्याच्या विकाराने आराम पडला़ डॉक्टरांनी सुरू केलेल्या गोळ्याही बंद केल्या़ प्राणायममुळे अनेक प्रकारचे आजार बरे होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यकाळात आजार होऊ नये म्हणून त्यांना योगाचे धडे दिले जात आहेत़
International Yoga Day 2019 : रामदेवबाबांना पाहून बनला ७५ वर्षांचा योगगुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:44 AM