अहमदनगर : अहमदनगर जिल्हा हा एक जून रोजी कोरोनामुक्त होईल, अशी घोषणा ३१ मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी केली होती. मात्र त्यानंतर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे प्रमाण वाढत गेले. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढतच गेली. कोरोनामुक्त होण्याऐवजी जिल्ह्याचा आकडा सव्वा दोनशेच्या पुढे सरकला. त्यामुळे जिल्हा कधी कोरोनामुक्त होईल, याचा मुहुर्त सांगणे कठीण आहे, अशी कबुली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यांचे हे वाक्य ऐकून जिल्हाधिकाºयांसह उपस्थित अधिकाºयांची चिंता वाढली.पालकमंत्री मुश्रिफ यांनी आपणच केलेल्या घोषणेची आठवण झाली. पत्रकारांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच त्यांनी हा खुलासा सुरवातीलाच करून टाकला. लॉकडाऊन उघडल्यानंतर रस्त्यावर मोठी गर्दी होते आहे. भाजीपाला खरेदीसाठी लोकांची उडी पडते आहे. काही लोक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसते आहे. ही सर्व परिस्थितीचे मुश्रीफ यांनी अवलोकन केले असावे. म्हणून तेही हतबल झाल्याचे पहायला मिळाले.जिल्हा एक जून रोजी कोरोनामुक्त होईल, अशी घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील आकडा दोनशेपार गेला. अधिकाºयांनी प्रयत्न केले, मात्र त्याला दृष्ट लागली. लोक बाहेरून येत राहिले आणि कोरोनाची संख्या वाढत गेली. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता आता तारीख सांगणे अवघड आहे. मात्र लवकरात लवकर जिल्हा कोरोनामुक्त होईल, हे आता सांगतो, असे मुश्रीफ म्हणाले.जिल्ह्यात आतापर्यंत २३२ जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील १६१ जण घरी परतले आहेत. मृत्यू झाले हे दुर्दैव आहे. आता येथून पुढे एकही मृत्यू होणार नाही, याची प्रशासनाला काळजी घ्यायची आहे. कोणाला लक्षणे नसतील तर तपासणीची गरज नाही. मात्र ज्यांना लक्षणे आहेत, त्यांनी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. परगावाहून आलेल्या ३३ हजार २९९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आता फक्त ६ हजार ९६३ जण क्वारंटाईन आहेत. लस मिळेपर्यंत स्थिती पूर्ववत होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे.जे गोरगरीब आहेत, त्यांना धान्य देण्याची योजना सरकारने आणली आहे. महिनाभरात त्यांना धान्य दिले जाईल. कधी डाळ, तर कधी चणा देण्याचे काम सुरू होईल, रेशनकार्ड ज्यांना नाही, अशानांही धान्य देण्याचे नियोजन आहे.----------प्रशासनात समन्वयाचा अभावसंगमनेरमध्ये दोन दिवसांपूर्वी कोरोनाने तीन महिलांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र जिल्हा प्रशासनाकडून दोन महिलांची मृत्यू झाल्याची माहिती दिली जात होती. अशावेळी संभ्रम तयार होतो. याबाबत प्रशासनाचा असमन्वय दिसतो, असे पत्रकारांनी छेडल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: पुढे येत उत्तर दिले. तिसरी महिला थेट मुंबई येथून जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. त्यामुळे त्या महिलेचे रेकॉर्ड तयार करण्याचे काम सुरू होते, त्यामुळे तीनच महिलांची माहिती दिली जात होती, असे सांगितले.
नगर जिल्हा कधी कोरोनामुक्त होईल याची तारीख सांगणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:59 AM