उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सत्कार केला. यावेळी उत्तर भारतीय सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश शर्मा, माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नगरसेवक अशोक गोंदकर, उपजिल्हाध्यक्ष अशोक पवार, पंडित गुडे उपस्थित होते. भाजयुमोच्या वतीने सचिन तांबे, अक्षय मुळे, लखन बेलदार, प्रसार शेलार, पंकज शर्मा, नरेश सुराणा यांनी सत्कार केला.
दरेकर म्हणाले, एकीकडे काँग्रेसच्या झालेल्या मेळाव्यात हजारोच्या संख्येने लोक जमा झाले. राज्यात रेस्टाॅरंट बार, पब रात्रभर गर्दीत सुरू आहेत. विवाह समारंभात मोठी गर्दी जमविली जाते. त्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजेरी लावत आहेत. मात्र, आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबाबत निर्बंध घातले जात आहेत. महाराजांचे नाव घेऊन जो पक्ष उभा राहिला, आज त्यांच्यात आशीर्वादाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, त्या महाराजांच्या जयंतीबाबत सर्वत्र वातावरण सुरळीत असताना निर्बंध लादणे योग्य नाही.
राज्य सरकारमधील एका मंत्र्याच्या बाबतीत जनतेच्या मनात संशय निर्माण होत असतील तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीने अशा मंत्र्याचे राजीनामे घेतले पाहिजेत. साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळाची स्थापना सरकारने केली पाहिजे. संस्थानच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष होत आहे. शासनाने संस्थानच्या विश्वस्त मंडळाची स्थापना करून हळूहळू दर्शन क्षमता वाढविली पाहिजे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर कोणालाही दडपशाही करता येणार नाही. पत्रकारावर शिर्डी संस्थान अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करणे ही बाब अतिशय निंदनीय आहे.
फोटो : १३ प्रवीण दरेकर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सत्कार करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर तसेच यावेळी उपस्थित नगरसेवक अशोक गोंदकर, मंगेश त्रिभुवन, सचिन तांबे, अशोक पवार, पंडित गुडे, आदी.