अहमदनगर : स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ््यास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी ते म्हणाले, परिणामांचा त्यांनी विचार केला नाही, सत्तेसाठी कधी त्यांनी तडतोड केली नाही, असा हा समाजसेवक म्हणजे बाळासाहेब विखे आहेत. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. त्यासाठी नद्याजोड प्रकल्पासाठी त्यांचा आग्रह होता. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते सहभागी होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याुमळे ते सरकारमध्ये मंत्री झाले होते. त्यांच्या आठवणी म्हणून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही या कार्यक्रमास सहभागी झाले आहेत. मागे वळून पाहताना मन भरून येत आहे, असे विखे म्हणाले. त्याचे वर्णन करताना शब्द अपुरे पडत आहेत. माझ्या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, ही स्व. विखे पाटलांचीच इच्छा होती.
स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून व्हर्च्युअल प्रकाशन होणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही या व्हॅर्च्युअल कार्यक्रमात मातोश्रीहुन सहभागी झाले असून प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.----------