श्रीरामपूर : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने भोकर येथील जगदंबा प्रासादिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी अशोक कारखान्याचे संचालक पुंजाहरी शिंदे, राजेंद्र चौधरी, सागर शिंदे, सेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल अभंग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश अमोलिक व उपाध्यक्षा श्रद्धा दंडवते उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक भीमभाऊ शेळके म्हणाले, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे यांच्या प्रयत्नातून प्रत्येक शाळांना थर्मल गन, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर या वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये तसेच त्यांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, असा त्यामागे हेतू आहे.
मुख्याध्यापक कृष्णनाथ काकडे यांनी ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांना डिजिटल वर्गांसाठी भौतिक सुविधा पुरविण्याबाबत आवाहन केले. याप्रसंगी शिक्षक सिद्धार्थ मकासरे, राहुल डावरे, रविकांत डोखे, गोरख जगदाळे, रामदास शिंगटे, कल्पना म्हस्के, बाळासाहेब मुजगुले, सुभाष साबळे, अशोक राहिंज आदी उपस्थित होते.