----------------
कुस्तीपटू डोंगरे भगिनींचा गौरव
अहमदनगर : क्रीडाक्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय कुस्तीपटू तथा ज्युदो खेळाडू प्रियंका डोंगरे व प्रतिभा डोंगरे भगिनींचा अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने गौरव करण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या हस्ते डोंगरे भगिनींचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे सभासद नाना डोंगरे यांचा निमगाव वाघा ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक धोंडिबा राक्षे, माजी संचालक कल्याण ठोंबरे, सुभाष ढेपे, पोपट कोतकर, सोसायटीचे सचिव स्वप्निल इथापे, विष्णू भुजबळ आदी उपस्थित होते.
--------------------
‘खेलो महाराष्ट्र योजना’ राबविण्याची मागणी
अहमदनगर : विद्यार्थ्याला शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही आपले करिअर करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
नगर शहर व जिल्ह्यात चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेली खेलो इंडिया
योजनेप्रमाणे खेलो महाराष्ट्र या योजनेचे प्रस्ताव तयार करुन राज्य सरकारकडे पाठवावे. ही योजना मंजूर करुन
घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार, प्रा. श्रीकांत निंबाळकर, लक्ष्मीकांत क्षीरसागर, वैभव जगताप, अशोक बाबर आदी उपस्थित होते.
-----------