अहमदनगर : नवीपेठेतील जय आनंद महावीर युवक मंडळाने गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या स्थापनेपासूनचे पदाधिकारी, मार्गदर्शक यांना एकत्र बोलावून त्यांच्या हस्ते शनिवारी (दि.१८) गणपतीची आरती केली. या सर्वांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या निमित्त झालेल्या गप्पागोष्टीत सर्वांनीच जुन्या आठवणींना उजाळा देत, मंडळाच्या सध्याच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी अरविंद गुंदेचा, चंपालाल लखारा, चंद्रकांत गुगळे, सुहास गांधी, संतोष चोपडा, केतन नवले, मनोज गुंदेचा, प्रकाश काकडे, संजय गांधी, संतोष गांधी, राहुल भळगट, अभय पितळे, संतोष बोकडिया, अजय मुथा, किसन बत्तीन, दीपक कातकडे, सुभाष राठी, संदीप चोपडा, यशवंत नवले, संजय मुनोत, प्रशांत पितळे, विजय मुनोत, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सेक्रेटरी हेमंत मुथा आदी उपस्थित होते.
शैलेश मुनोत म्हणाले, नवीपेठेत दोन मंडळ एकत्र येऊन जय आनंद महावीर युवक मंडळ स्थापन झाले. या मंडळाला चांगल्या कामांची मोठी परंपरा आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची व विधायक कामे करण्याची शिकवण मंडळाच्या ज्येष्ठांनी नेहमीच दिली.
मूर्तिकार सुनील नाळके म्हणाले, जय आनंद मंडळाने गणपतीची चांदीची मूर्ती तयार करण्याचे काम माझ्यावर सोपविले होते. जवळपास वीस किलोंची ही मूर्ती साकारताना कलाकार म्हणून मोठा आनंद मिळाला. मंडळाची जवळपास दोन दशकांची वाटचाल अतिशय उल्लेखनीय आहे. नितीन मुनोत यांनी स्वागत केले, तर आभार अभय लोढा यांनी मानले.
--
२१जय आनंद आरती
नगर शहरातील नवीपेठेतील जय आनंद मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा मंडळातर्फे शनिवारी सत्कार करण्यात आला.