खर्डा : जामखेड तालुक्यातील सातेफळ येथील ग्रीन व्हॅली म्हणून संबोधले जाणारे खैरी मध्यम प्रकल्पाचे जलपूजन शेतकरी कुटुंबातील महिलांच्या हस्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नुकतेच करण्यात आले.
जामखेड तालुक्याला संजीवनी ठरलेले खैरी मध्यम प्रकल्प यावर्षी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. धरणाचे काम पूर्ण झाल्यापासून प्रथमच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबातील महिलांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, तरडगावच्या सरपंच ज्योती जयराम खोत, उपसरपंच सुमन पवार, खर्डा ग्रामपंचायत सदस्य संजीवनी पाटील, रोहिणी लोंढे, दीपाली आजबे, जनाबाई केसकर, बेबीताई बांगर, बायडाबाई भोसले, कमल खोत, शिवकन्या केसकर ,तेजश्री लोंढे, दीपाली पाटील, बाई बांगर, मैनाबाई खोत, डॉ. जयराम खोत, बाबा केसकर, पांडुरंग भोसले, सचिन बांगर, विलास जाधव, सुनील लटके यांच्यासह वाकी, लोणी, सातेफळ, वंजारवाडी, तरडगाव, दौंडची वाडी, खर्डा आदी परिसरातील शेतकरी, महिला उपस्थित होते.
----
१६ खर्डा
महिला शेतकऱ्यांच्या हस्ते जामखेड तालुक्यातील खैरी प्रकल्पात जलपूजन करण्यात आले.