अहमदनगर : जिल्हा मोठा असल्याने येथील प्रश्न समजावून घेऊन आणि गावपातळीवर थेट संपर्क ठेवून विकास योजना जलदगतीने मार्गी लावण्यावर आपला भर राहिल. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आपला प्राधान्यक्रम राहिल, असा मनोदय नूतन जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी आज व्यक्त केला.प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडून द्विवेदी यांनी पदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर लगेचच त्यांनी महसूल अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक संवाद साधत द्विवेदी यांनी अधिका-यांकडून जिल्ह्याविषयी माहिती घेतली.जिल्हा आकारमानाने मोठा असल्याने प्रत्येकाशी समन्वय ठेवून वेगाने काम मार्गी लावण्यावर आपला भर राहणार आहे. त्यादृष्टीने गावपातळीवर काम करणा-या शासकीय घटकांशी थेट संपर्क ठेवून तेथील कामे जलदगतीने मार्गी लागतील, यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी अधिका-यांना दिला.शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने असा समन्वय प्रस्थापित करण्यावर आपला भर राहिल, असेही त्यांनी सांगितले़ यावेळी अपर जिल्हाधिकारी पालवे, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, वामनराव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी एन. एस. भदाणे, तहसीलदार आप्पासाहेब शिंदे, गणेश मरकड, शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जलयुक्त अभियान हीच सर्वोच्च प्राथमिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 7:42 PM
जिल्हा मोठा असल्याने येथील प्रश्न समजावून घेऊन आणि गावपातळीवर थेट संपर्क ठेवून विकास योजना जलदगतीने मार्गी लावण्यावर आपला भर राहिल. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आपला प्राधान्यक्रम राहिल, असा मनोदय नूतन जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी आज व्यक्त केला.
ठळक मुद्देद्विवेदी यांनी जिल्हाधिकारीपदाची सुत्रे स्वीकारली अधिकाऱ्यांसह पहिलीच बैठक