शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत प्रमुख पक्षांना अपक्ष नडणार ?

By admin | Published: December 23, 2015 11:19 PM

जामखेड : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सहाव्या दिवसाअखेर एकाही अपक्षाने माघार न घेतल्याने राजकीय पक्षांना अपक्षच नडणार, अशी चर्चा शहरात रंगली आहे़

जामखेड : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सहाव्या दिवसाअखेर एकाही अपक्षाने माघार न घेतल्याने राजकीय पक्षांना अपक्षच नडणार, अशी चर्चा शहरात रंगली आहे़ पुढील चार दिवस सुट्ट्या असल्यामुळे सोमवारी शेवटचा दिवस अर्ज मागे घेण्यासाठी उरला आहे़ त्यामुळे अपक्षांवर सोमवारी कोणाची जादू होणार? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे़ तर किती जणांना स्वीकृत नगरसेवक करणार? असा प्रश्न अपक्ष उपस्थित करीत आहेत़ अपक्षांची ही ताठर भूमिका महायुती, राष्ट्रवादी व काँगे्रससाठी डोकेदुखी ठरत आहे. जामखेड नगरपरिषदेसाठी १६० जणांचे २०८ उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत. त्यापैकी ४८ जणांचे दुबार अर्ज आहेत. त्यांनी दोन प्रभागात अर्ज भरले आहेत.महायुती व राष्ट्रवादी आघाडीने प्रभागनिहाय अपक्षांची यादी तयार केली आहे. कोणामुळे तोटा होऊ शकतो व कोणामुळे लाभ होईल, याचे आडाखे बांधले जात आहेत़ अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवाराला अर्ज माघारीसाठी स्वीकृत नगरसेवक तर काहींना आर्थिक आमिष दाखविले जात आहे़ तर विरोधकांना अडचणीच्या ठरणाऱ्या अपक्षाला आर्थिक पाठबळ देऊन निवडणूक लढविण्याची गळ घातली जात आहे़ पहिल्याच निवडणुकीत अपक्षांची संख्या वाढल्यामुळे राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे़ जातीची गणिते मांडून इतरांपेक्षा आपणच प्रबळ असल्याचा दावा अनेक अपक्षांकडून केला जात आहे़ त्यामुळे अर्ज मागे घेण्यास इच्छुक कोणीही दिसून येत नाही़ आता सलग चार दिवस सुट्ट्या आहेत. काही अपक्ष अर्ज मागे घेण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळावी, म्हणून चार दिवसाच्या सहलीला निघाले आहेत. सलग चार दिवसाच्या सुट्टीनंतर एकच दिवस अर्ज मागे घेण्यासाठी राहणार आहे. त्यामुळे या चार दिवसात अपक्षांचे अर्ज काढण्यात काय जादू घडते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)