जामखेड : तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीसाठी सर्व प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केली असून १३ टेबलवर मतमोजणी ठेवली आहे. त्यासाठी तीन कर्मचारी प्रत्येक टेबलवर राहणार आहेत. तेरा फेऱ्या होणार आहेत.
१२८ मतपेट्या असून तालुक्यातील सर्वात मोठी खर्डा ग्रामपंचायतची मतमोजणी सुरवातीला होणार आहे. १५ रोजी तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मतदानानंतर सर्व मतपेट्या तहसील कार्यालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी रविवारी मतमोजणीसाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. त्यानुसार सोमवारी सकाळी नऊ वाजता १३ टेबलवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी मतमोजणी केंद्रात मंडप टाकण्यात आला आहे. मतमोजणी ठिकाणी जाळी बसवण्यात आली. ज्या ग्रामपंचायतीचे मतमोजणी होणार आहे. त्यांचेच प्रतिनिधी मतमोजणीसाठी असणार आहेत. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळता येईल. तसेच मतमोजणी पासून २०० फूट अंतरावर रेषा आखली आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरवातीला १३ टेबलवर खर्डा ग्रामपंचायतची मतमोजणी होणार आहे.
दुसऱ्या फेरीत अरणगाव, पाटोदा, डोणगाव, तिसऱ्या फेरीत साकत, पिंपरखेड व दिघोळ चौथ्या फेरीत नान्नज, धानोरा, कवडगाव, आघी पाचव्या फेरीत चोंडी, बाळगव्हाण, आनंदवाडी, बावी, सावरगाव सहाव्या फेरीत पाडळी, मोहा, कुसडगाव, नायगाव, मोहरी सातव्या फेरीत नाहुली, देवदैठण, जायभायवाडी, चोभेवाडी, गुरेवाडी आठव्या फेरीत धामणगाव, बांधखडक पिंपळगाव आळवा, खांडवी, पिंपळगाव उंडा, नवव्या फेरीत तेलंगसी, घोडेगाव, बोरले, वाघा दहाव्या फेरीत जवळके, तरडगाव, जातेगाव, लोणी अशाप्रकारे दहा फेरीत ३९ ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे.