जामखेड : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत मिळावे, या प्रमुख मागणीसाठी जामखेड येथील खर्डा चौकात भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिंवसरा, अनिल लोखंडे, रवी सुरवसे, माजी सभापती भगवान मुरूमकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, शहराध्यक्ष अभिजीतराजे राळेभात, देखरेख संघाचे अध्यक्ष सुधीर राळेभात, बोरले संस्थेचे अध्यक्ष भरत काकडे, उदयसिंह पवार, तात्याराम पोकळे, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, मोहन गडदे, माउली जायभाय, भागवत सुरवसे, सागर सोनवणे, बाजीराव गोपळघरे, धनंजय गावडे, गौतम कोल्हे आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही. आतापर्यंत अनेक निवडणुका पुढे ढकलल्या तशा याही ढकलाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडू.