शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

जामखेडमध्ये अप्सरा उतरल्या महाश्रमदानाला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 10:46 PM

‘श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतो, रिमझिम पडतो’ ‘लांडोरीसंगे मोर थुईथुई नाचतो’ या गाण्याच्या तालावर जामखेडमधील अप्सरांनी नृत्य सादर करून श्रमदानासाठी आलेल्या उपस्थितांची मने जिंकली. तसेच श्रमदानही केलं.

जामखेड – ‘श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतो, रिमझिम पडतो’ ‘लांडोरीसंगे मोर थुईथुई नाचतो’ या गाण्याच्या तालावर जामखेडमधील अप्सरांनी नृत्य सादर करून श्रमदानासाठी आलेल्या उपस्थितांची मने जिंकली. तसेच श्रमदानही केलं.

निमित्त होते, जामखेड तालुक्यातील सावरगाव येथील वॉटर कप स्पर्धेतील महाश्रमदानाचे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सावरगांव सहभाग झाले.

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जामखेड येथील कलाकेंद्रातील नृत्य करून पोट भरणाऱ्या महीला सिनेअभिनेते अमिरखान राबवीत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत सहभागी होत आज श्रमदान केले. श्रमदान करण्यासाठी अप्सरांनी ग्रामीण विकास केंद्राचे अध्यक्ष अरूण जाधव यांच्याशी चर्चा केली. जाधव यांनी तात्काळ यास होकार देऊन सावरगाव येथे श्रमदान व नृत्य व गाणे सादर करून त्यातून श्रमदानाला उत्स्फूर्त करण्याची योजना आखण्यात आली. त्यांनी वॉटर कप स्पर्धेतील शेवटच्या दिवशी सहभागी होण्याचा दिवस निवडला. 

      सायंकाळी पाचच्या सुमारास जवळपास ५०  अप्सरा सावरगाव येथील श्रमदानासाठी कामावर गेल्या. तेथे उपस्थित सावरगाव नागरिक व जामखेड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक व कर्मचारी, नगरसेवक व इतर प्रतिष्ठित नागरिकांसह गावातील लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपुढे पाणी आडवा..... पाणी जिरवा.... पाणी वाचवा असा जयघोष केला. 

        अप्सरा अलका जाधव, जया अंधारे,ज्योती पवार, उमा जाधव, संजीवनी जाधव, मंदा चंदन, राजश्री जाधव यांच्या सहकारी नृत्यांगना वाद्यवृंदासह आल्या त्यांनी विविध लावण्या व गाणे सादर करून ढोलकीच्या तालावर नृत्य केले. अप्सरांच्या या अदाकारीने श्रमदानासाठी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये जोश भरला अर्धा पाऊण तासाच्या अप्सरांच्या अदाकारीने उपस्थितांचे मने जिंकली. यानंतर अप्सरांनी उपस्थितासह सर्वांच्या अंगात कामाचे तुफान आले जवळपास दोन अडीच तास डोंगर पायथ्याशी चर खोदून महाश्रमदान केले. 

         जामखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी देखील या उपक्रमात आपल्या टिमसह सहभागी होऊन श्रमदान केले. ग्रामीण विकास केंद्राचे अध्यक्ष अरूण जाधव, नगरसेवक गुलचंद अंधारे, अमित जाधव, सनी जाधव, विशाल जाधव व संतोष गर्जे आदींसह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. सावरगांवचे सरपंच व पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक दहिफळे साहेब यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर