जामखेड : साडेपाच महिन्यांपासून रिक्त असलेल्या जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सध्या जोरदार रस्सीखेच आहे. वारे, राळेभात, वराट व पाटील यांनी जोरदार फिल्डींग लावली असून तालुकाध्यक्षपदाचा वाद माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षनिरीक्षक दिलीप वळसे यांच्या कोर्टात गेला आहे.कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातून लढण्याचे अजित पवार यांनी संकेत दिल्याने या पदाला महत्व आले आहे.तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी यांनी साडेपाच महिन्यापूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे माजी मंत्री सुरेश धस यांच्याकडे प्रभारी पदभार होता. त्यांनी बीड जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणूक वेळी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी झाली होती. पक्षाला तालुक्यात कोणाचाच आधार नसल्याने पक्षात मरगळ आली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या या पदासाठी कोणी इच्छुक नव्हते.अजित पवार यांनी कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे नुकतेच संकेत दिले. त्यामुळे दुर्लक्षित असलेल्या तालुकाध्यक्षपदासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, प्रा. मधुकर राळेभात, बाजार समितीचे संचालक संजय वराट, जवळा जिल्हा गटाचे नेते प्रदीप पाटील, साकतचे माजी सरपंच हनुमंत पाटील यांनी या पदासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.तालुकाध्यक्षपदाचा वाद जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या कोर्टातून थेट पक्षनिरीक्षक दिलीप वळसे, अजित पवार यांच्या कोर्टात गेला आहे. पक्षातील नवा- जुना वाद यावेळी उफाळून आला आहे. वरिष्ठ नेत्यांपर्यंत भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. यामध्ये दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात यांनी आघाडी घेतल्याचे दिसते. त्यामुळे तालुकाध्यक्ष कोण होणार? याकडे तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
जामखेड राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाचा वाद पवारांच्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:27 AM
जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सध्या जोरदार रस्सीखेच आहे. वारे, राळेभात, वराट व पाटील यांनी जोरदार फिल्डींग लावली असून तालुकाध्यक्षपदाचा वाद माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षनिरीक्षक दिलीप वळसे यांच्या कोर्टात गेला आहे.
ठळक मुद्देअजित पवार यांनी कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे नुकतेच संकेत दिले. त्यामुळे तालुकाध्यक्षपदासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, प्रा. मधुकर राळेभात, बाजार समितीचे संचालक संजय वराट, जवळा जिल्हा गटाचे नेते प्रदीप पाटील, साकतचे माजी सरपंच हनुमंत पाटील यांनी या पदासाठी जोरदार फिल्डींग लावलीतालुकाध्यक्षपदाचा वाद जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या कोर्टातून थेट पक्षनिरीक्षक दिलीप वळसे, अजित पवार यांच्या कोर्टात गेला आहे.पक्षातील नवा- जुना वाद यावेळी उफाळून आला आहे.