जामखेड ( जि. अहमदनगर) : येथील पोकळे वस्तीवर तात्याराम पोकळे यांच्या घरावर बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला.
दोन लाख रुपये रोख व 22 तोळे सोने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक सुरेश माने,अमरजित मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेनंतर जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
रात्री एक ते तीनच्या सुमारास ही चोरी झाली. दरोडेखोरांनी पाठीमागचा दरवाजा कटावनीच्या सहाय्याने तोडला आणि ते आत घुसले. सर्व झोपेत असतानाच ही चोरी झाली. तात्याराम यांच्या आई पहाटे ऊठल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर ही चोरी लक्षात आली.
मिरजगावलाही दरोडा
मिरजगाव : येथील शिंगवी काॅलनीतील अॅड.मधुकर विठ्ठल कोरडे यांच्या घरावर दरोडा पडला. यात तीन लाखांचा ऐवज लंपास झाला. जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, गृहविभागाचे उप अधिक्षक प्राजंली सोनवणे, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक सुरेश माने,अमरजित मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून श्ववन पथक,फिंगरपिट पथकाला पाचारण केले आहे