अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे पाण्याचे जार वाटप पूर्णपणे ठप्प झाले आहे. हॉटेलसह लग्नसमारंभ, दुकाने, खासगी कार्यालये बंद असल्याने जार वितरण बंद करण्यात आले असून, शहरातील काहींनी व्यवसायही बंद केले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव नगरमध्ये झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे दुकाने, खासगी कार्यालये, हॉटेल, वडापाव, चहाच्या गाड्याही बंद असल्याने पाण्याची मागणी घटली आहे. महापालिकेचे पाणी वेळेवर येत नसल्याने काही भागात जारची मागणी केली जात होती. मात्र ही मागणीही घटली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागिरकांनी जारचे पाणी घेणे बंद केले आहे. सध्या केवळ कोविड केअर सेंटर व कोविड रुग्णालयांकडूनच जारची मागणी होत आहे. परंतु, अशा ठिकाणी जार वाटप करणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. रुग्णालयांना पाण्याचे वाटप करताना विशेष काळजी घेतली जात आहे. रुग्णालयांतील जार न बदलता तिथे असलेल्या जारमध्ये पाणी टाकले जात असून, इतर मागणी घटली आहे. त्यामुळे जारचा व्यावसाय कोरोनामुळे अडचणीत आला आहे.
...
नगरमध्ये १५० आरओ प्लँट
नगर शहरात अंदाजे १५० आरओ प्लँट असतील. त्यांच्याकडून दुकाने, मंगल कार्यालये, घरगुती समारंभ, मोठे मॉल, पेट्रोल पंप, बँका, इतर लहान मोठ्या दुकानांना जार पुरविले जात होते. परंतु, सध्या कडक निर्बंध लागू असल्याने वाहने बाहेर काढता येत नाहीत. त्यामुळे हा व्यवसाय सध्या पूर्णपणे बंदच आहे, अशी माहिती व्यावसायिकांकडून देण्यात आली आहे.
.....
कोरोनामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने जार वितरित करणे बंद झाले आहे. त्यात दुकाने, मंगल कार्यालये, हॉटेल आदी सर्व बंद असल्याने मागणी घटल्यामुळे प्लँट बंद ठेवण्यात आले आहेत.
- वैभव भुतकर, व्यावसायिक
.....
सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने अनेकांनी प्लँट बंद ठेवलेले आहेत. रुग्णालये व कोविड केअर सेंटरला जार पुरविले जात आहेत. परंतु, तेही जारची बदली न करता पुरविले जात आहेत. घरगुती मागणी पूर्णपणे घटली आहे.
- तुषार वाकळे, व्यावसायिक
---
डमी - नेट फोटो
२९ वॉटर जार डमी
जार
वॉटर
वॉटर-२