नेवासा : शहरात दहा दिवस चाललेल्या एनपीएल टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धांमध्ये चांद्याच्या जयहिंद संघाने शेवटपर्यंत चुरशीची खेळी करत प्रथम क्रमांकाचा नामदार चषक पटकावला आहे.
नामदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एनपीएलच्या प्रा. सुधीर बोरकर, किरण शिंदे व सहकाऱ्यांनी आयोजित केली होती.
या क्रिकेट स्पर्धेत प्रथम बक्षिसाचा मानकरी चांदा येथील जय हिंद संघ ठरला. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जयहिंद, चांदा संघाने ३ षटकात ६९ धावांचे आव्हान मराठा वॉरियर्स संघासमोर उभे केले होते. तीन षटकांमध्ये मराठा वॉरियर्स संघाने ३२ धावा केल्याने त्यांचा पराभव झाला. द्वितीय पारितोषिक (३१ हजार व चषक) मराठा वॉरियर्स संघाला मिळाले. तृतीय पारितोषिक (२१ हजार व चषक) समीर सर सायन्स अकॅडमी संघाला, चौथे पारितोषिक (१५ हजार व चषक) नेवासा ब्लास्टर संघाला मिळाले आहे.
इतर बक्षिसांमध्ये मॅन ऑफ द सिरीज रेंजर सायकल अक्षय जऱ्हाड, मॅन ऑफ द मॅच फायनल अक्षय जऱ्हाड, विजय लोणारी, अक्षय जऱ्हाड, उत्कृष्ट फलंदाज संदीप वाघमारे ठरला.
यावेळी प्रा. सुधीर बोरकर, सहायक अभियंता मनोहर पाटील, नवनाथ घोंगडे, साहेबराव दाणे, लक्ष्मीकांत नांगरे, राजेंद्र वाघ, नितीन ढवळे, किरण शिंदे, प्रा. वाघमारे, स्वीय सहायक सुनील जाधव, सुलेमान मणियार, बाळू मुथ्था, राजेंद्र रासने आदी उपस्थित होते.
फोटो : ०३ चांदा
नेवासा येथील क्रिकेट स्पर्धेत जय हिंद, चांदा संघाने विजेतेपद पटकाविले.