अहमदनगर- कोरोनाबाधित महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर त्या मातेचा दुसºया दिवशी मृत्यू झाला. बाळांचा जन्म होताच त्यांना मातेपासून अलग करण्यात आले होते. त्या दोन्ही बाळांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचाही जीव भांड्यात पडला आहे. शनिवारी जिल्ह्यात एकाच दिवशी सात जण कोरोनाबाधित आढळले असल्याने एकीकडे चिंता वाढली आहे. मात्र या बाळांच्या अहवालाने एक सुखद बातमीही मिळाली आहे.निंबळक येथील कोरोनाबाधित महिलेने जुळया मुलांना जन्म दिला होता. कृत्रीम गर्भधारणा केलेल्या या महिलेची मुदतपूर्व सिझेरियन करून प्रसुती करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही बाळांची प्रकृती ठीक होती. जन्म होताच या मुलांना मातेपासून अलग करण्यात आले होते. त्यानंतर त्या बाळांचे घशातील स्त्राव चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी सकाळी आला. त्यात त्या बाळांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला. या मुलांची जिल्हा रुग्णालयात सध्या डॉ.चेतना बहुरुपी काळजी घेत आहेत.--नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधीत नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यामध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे कुटुंब रेल्वे स्टेशन रोडवरील सथ्था कॉलनीतील रहिवाशी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. याच कुटुंबातील आणखी एक महिलाही कोरोनाबाधित असून ती पुणे येथे राहत आहे. याशिवाय संगमनेर तालुक्यातही दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील भारत् नगर आणि मोेमीनपुरा येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी सात कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे नगर शहरात चिंता वाढली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाºयांची संख्या वाढली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे क्वारंटाईन न होता थेट नातेवाईकांच्या घरात जात असल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते.
जीव भांड्यात पडला, ‘त्या’ दोन बाळांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:21 AM