अहमदनगर: अहमदनगर पहिली मंडळी चर्चच्यावतीने पवित्र सप्ताहानिमित्त (पाम संडे) रविवारी नगर शहरातून ‘झावळ्याची प्रभात फेरी’ काढण्यात आली. या फेरीत विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
प्रभागत फेरीत सहभागी झालेल्या मुलांनी आपल्या झावळ्या फुलांनी सजविल्या होत्या. पाम संडे हा सण ईस्टर संडेच्या एक आठवड्यापूर्वी साजरा केला जातो. जेरुसलेम नगरीत प्रभू येशुचा प्रवेश आणि त्यानंतरची मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात झावळ्यांच्या रविवारने होते.त्यांचे स्मरण म्हणून ही प्रतिकात्मक फेरी प्रत्येक वर्षी काढली जाते. त्यात मंडळी मधील सर्व सभासद सहभागी झाले होते. या फेरीला पहिली मंडळी सीएनआय चर्च, हातपुरा येथून प्रारंभ झाल्यानंतर ही फेरी धरती चौक, वस्तू संग्रहालय, नालबंद खुंट, जुना कापड बाजार, भिंगार चौक, माणिकचौक, चाँद सुलताना हायस्कूल, बंगाल चौक, युनियन कॉलेज मार्गे पुन्हा चर्च येथे सांगता झाली.
याप्रसंगी रेव्ह. जे.आर.वाघमारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. फेरीत चर्चचे सचिव अमोल लोंढे, खजिनदार सॅम्युअल खरात, कमेटी सभासद प्रसन्न शिंदे, समिती अध्यक्ष राहुल थोरात, गिरिष शिरसाठ, गिरिष लाड, हर्षल जाधव, इम्यानुयल जाधव, प्रविण देठे, संकर्ष क्षेत्रे, प्रितम जाधव, राजू गांधी, सुमित ढगे आदिंसह खिस्त समाज बांधव सहभागी झाले होते.