अहमदनगर : अंधश्रद्धेतून मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तत्कालीन जिल्हा न्यायाधीश व मोठादेवी ट्रस्टचे अध्यक्ष नागेश बी. नाव्हकर यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
या अर्जावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले असून याप्रकरणी ३ मे रोजी सुनावणी होणार आहे. मंदिरात सोने पुरल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात न्हावकर यांच्यासह ट्रस्टचे तत्कालीन विश्वस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर दोषींविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत विश्वस्त संदीप पालवे व सोलापूर येथील पंडित प्रदीप जाधव यांना अटक केली आहे. न्हावकर यांनी २३ एप्रिल रोजी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज सोमवारी न्यायालयासमोर आला. या अर्जावर सरकारी पक्षाचे म्हणणे आल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.