शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

संतप्त महिलांचा जामखेड पोलीस ठाण्याला घेराव; ग्रामीण रुग्णालयाला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 1:17 PM

जामखेडमधील महिलांनी पोलीस ठाण्याला सोमवारी घेराव घातला. तसेच राळेभात बंधूंवर उपचारासाठी उशीर करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचे निलंबन करावे, यासाठी महिलांनी रुग्णालयाला टाळे ठोकले.

जामखेड : राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी जामखेडमधील महिलांनी पोलीस ठाण्याला सोमवारी घेराव घातला. तसेच राळेभात बंधूंवर उपचारासाठी उशीर करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचे निलंबन करावे, यासाठी महिलांनी रुग्णालयाला टाळे ठोकले.शनिवारी (दि. २८) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास राळेभात बंधुवर गुंडांनी गोळीबार करून ठार मारले. यामधील आरोपींना अटक करावे तसेच तालमीच्या नावाखाली गुंड पोसण्याचे काम माने कुटुंब करीत आहेत. त्यांना याप्रकरणी सहआरोपी करावे, अशी मागणी करीत सोमवारी सकाळी जामखेडमधील महिलांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला.

राळेभात बंधूंच्या उपचाराला उशीर करणा-या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराचे निलंबन करावे व रूग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध होईपर्यंत दवाखाना उघडून देणार नाही, असे सांगत संतप्त महिलांनी ग्रामीण रुग्णालयाला टाळे ठोकले. यानंतर महिलांचा संतप्त मोर्चा नगरपरिषदेवर आला. नगरपरिषदेचा तालीमला असलेला परवाना तातडीने स्थायी समितीची सभा घेऊन रद्द करावा, तालीमवर बुलडोझर चालवून उद्धवस्त करावी, अशी मागणी केली़ तसेच याची दखल न घेतल्यास चार दिवसानंतर तालीम पाडण्याचा इशारा महिलांनी दिला. वरील सर्व मागण्यांचा विचार न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा महिलांनी दिला.माजी नगराध्यक्षा प्रिती राळेभात, नगरसेविका कमल राळेभात, रूपाली राळेभात, चंद्रकला राळेभात, सुनीता राळेभात, पदमा वारे, रूपाली काकडे, वंदना राळेभात, उषा राळेभात, वैशाली राळेभात, लता राळेभात, योगीता राळेभात यांच्यासह सुमारे दोनशे संतप्त महिलांनी मोर्चा काढला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसJamkhedजामखेड